जम्मू : सोमवारचा दिवस घातवार ठरला. बसचा भीषण अपघात झाला असून १५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. जम्मू काश्मीरच्या उधमपूर परिसरात हा भीषण अपघात झाला. कनोट गावात बस दरीत कोसळून अपघात झाला. बसचा अक्षरश: चक्काचूर झाला. डोंगरावरून बस कोसळून मोठं नुकसान झालं. बस खाली कोसळत होती तेव्हा प्रवाशांच्या किंकाळण्याचा आवाज येत होती.
अपघात इतका भीषण होता की १५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताचं नेमकं कारण समजू शकलं नाही. आणि काश्मीर पोलीस मिळून रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत. बसवरचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू आहे.
बसमध्ये बसचं मोठं नुकसान झालं आहे. बसच्या खाली काही प्रवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन तातडीनं सुरू आहे. मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ३० हून अधिक प्रवासी होती. गाडी ओव्हरलोड झाल्याने हा अपघात झाला असावा असं स्थानिकांचं म्हणणं आहे. अपघात कसा झाला याची चौकशी केली पोलिसांकडून केली जात आहे.